डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील तीन विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी परदेशात निवड

इचलकरंजी: विजय मकोटे
ता. ०५ ऑक्टोंबरः येथील डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील तीन विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी अमेरिका व यु.के. मधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड झालेली आहे. या निवडीमुळे डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची परदेशात उच्च शिक्षण घेण्याची परंपरा कायम राहीली आहे. प्रथमेश उरुणकर व चेतन नांद्रे यांची एम.एस इन मेकॅट्रॉनिक्स साठी अमेरिकेतील ‘मिशिगन टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी’ मध्ये निवड झालेली आहे तर सौरव देशपांडे याची एम.एस. इन ‘इंजिनिअरींग अँन्ड मॅनेजमेंट इन मॅन्युफॅक्चरींग सिस्टीम्स’ साठी यु.के. तील क्रॅनफील्ड युनिव्हर्सिटी मध्ये निवड झालेली आहे.
डीकेटीईमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींग अभ्यासक्रमातील मेटॅलर्जी, मशिन टुल्स अ‍ॅड प्रोसेसिंग, वर्कशॉप प्रॅक्टीस, टूल इंजिनिअरींग मेकॅट्रॉनिक्स इंडस्ट्रीयल अ‍ॅटोमेशन, हायड्रॉलिक्स व न्युमॅटिक्स या विषयांचा विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी फायदा झालेला आहे.  तसेच मेकॅनिकल विभागातील स्मार्ट फौन्ड्री, बॉश लॅब, मॅन्युफॅक्चरींग प्रोसेस या लॅबमध्ये घेतलेल्या ट्रेनिंगचा व केलेल्या प्रोजेक्टचा देखील त्यांना निवडीसाठी फायदा झालेला आहे. विद्यार्थ्यांनी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणा-या जी.आर.ई. व आई.एल.टी.एस. परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे. डीकेटीई मध्ये असलेल्या तज्ञ प्राध्यापक, अत्याधुनिक सोयी सुविधा व संशोधनात्मक शैक्षणिक वातावरण यामुळे परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी चालना मिळत आहे.
विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर.व्ही. केतकर, सचिव डॉ.सौ.सपना आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक प्रा.डॉ.पी.व्ही.कडोले, उपसंचालक प्रा.डॉ. यु.जे. पाटील, विभागप्रमुख प्रा.डॉ. व्ही.आर. नाईक, प्रा.आर.डी. पाटील व अन्य प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.