कडवई:(नियाझ खान)
पोलीस खात्यात ३१ वर्षांची यशस्वी सेवा बजावणाऱ्या चंद्रकांत तुकाराम कांबळे यांना पीएसआय (पोलीस उपनिरीक्षक) पदावर पदोन्नती प्रदान करण्यात आली आहे. हा मानाचा सोहळा संगमेश्वर पोलीस स्टेशन येथे पार पडला. त्यांच्या पदोन्नतीचे प्रमाणपत्र मा. पोलीस निरीक्षक श्री. यादव सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
चंद्रकांत कांबळे यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी शामल, मुलगी मृणाली, मुलगा निखिल आणि आई श्रीमती शोभा तुकाराम कांबळे यांचा समावेश आहे. त्यांचे भाऊ प्रमोद तुकाराम कांबळे सुद्धा पोलीस खात्यात कार्यरत आहेत, ज्यामुळे कुटुंबाचा पोलीस सेवेशी सखोल संबंध आहे.
[कोकणातील झटपट बातम्यां आमच्या पोर्टलवर महालक्ष्मी टाइम्स-महाराष्ट् पोलीस टाइम्स -न्युज 17—जाहिरातीसाठी संपर्क…सचिन पाटोळे-9922749187..
नियाझ खान —9921435330..
दिपक तुळसणकर —9730389876)..
नवीन पत्रकारांना काम करण्याची संधी… संपर्क साधावा… उपसंपादक –मुजीब खान..9860153462].
चंद्रकांत कांबळे यांनी २० मे १९९२ रोजी पोलीस खात्यात रुजू होऊन आपल्या सेवेला सुरुवात केली. त्यांनी प्रथम रत्नागिरी मुख्यालयात सेवा दिली आणि त्यानंतर रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन, देवरुख पोलीस स्टेशन, साखरपा आऊट पोस्ट, खेड पोलीस स्टेशन आणि २०१९ पासून संगमेश्वर पोलीस स्टेशन येथे सेवा बजावली आहे.
कांबळे यांनी सांगितले की, त्यांच्या सेवेत वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी अंमलदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. डिग्नी आणि माखजन आउट पोस्टचा कार्यभार सांभाळताना त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. एएसआय या पदावर तीन वर्षांपूर्वी त्यांची पदोन्नती झाली होती, आणि आता त्यांनी पीएसआय पदावर यशस्वीरित्या प्रगती केली आहे.
चंद्रकांत कांबळे यांचे मूळ गाव पुनसगाव, तालुका लांजा असून त्यांच्या वडिलांनीही पोलीस खात्यात सेवा दिली आहे. विशेष म्हणजे वडील आणि चंद्रकांत यांनी दहा वर्षे एकत्रित नोकरी केली आहे. २००२ साली त्यांच्या वडिलांनी निवृत्ती घेतली.
पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर चंद्रकांत कांबळे यांचे कुटुंब, सहकारी आणि अधिकारी वर्गाकडून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या मेहनती आणि निष्ठेमुळे ही पदोन्नती त्यांना प्राप्त झाली आहे, ज्यामुळे संगमेश्वर पोलीस स्टेशनसाठी हा गौरवाचा क्षण ठरला आहे.