स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त संगमेश्वर येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न

 

कडवई:(दिपक तुळसणकर)

भारताचे माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री, माजी उपमुख्यमंत्री, आणि शेतकऱ्यांचे कैवारी लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त संगमेश्वर येथील नावडी येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

[कोकणातील झटपट बातम्यां आमच्या पोर्टलवर महालक्ष्मी टाइम्स-महाराष्ट् पोलीस टाइम्स -न्युज 17—जाहिरातीसाठी संपर्क…सचिन पाटोळे-9922749187..

नियाझ खान —9921435330..

दिपक तुळसणकर —9730389876)..

नवीन पत्रकारांना काम करण्याची संधी… संपर्क साधावा… उपसंपादक –मुजीब खान..9860153462].

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून नोकरी व व्यवसायानिमित्त संगमेश्वर येथे स्थायिक असलेल्या समाजबांधवांनी, तसेच मुंडे साहेबांविषयी विशेष आदर असलेल्या नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. मनोहर ढाकणे यांच्या हस्ते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मुंडे प्रेमींनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यांच्या भाषणांतून मुंडे साहेबांच्या लोकसंग्राहक व्यक्तिमत्त्वाचे आणि त्यांनी सामान्य जनतेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे स्मरण झाले.

या कार्यक्रमात पोलीस अधिकारी, डॉक्टर, शिक्षक, विद्यार्थी, आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये डॉ. मनोहर ढाकणे, डॉ. किशोर ढाकणे, श्री. प्रकाश कोळेकर, डॉ. खाडे अंगद, पोलीस कॉन्स्टेबल गणेश बिक्कड, तेजस वानखेडे, चांगदेव जगताप, चौरे गणेश, घुगे रोहित, आनंद फाळके, डॉ. विरभद्र बेलुरे, धनाजी भांगे, आणि विजय कांबळे यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. धनाजी भांगे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. किशोर ढाकणे यांनी केले.स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम उपस्थितांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे यशस्वीरीत्या पार पडला.