रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि संगमेश्वर तालुका क्रिकेट असोसिएशनची मान्यता
संगमेश्वर तालुक्यातील गुणवंत खेळाडूंना प्रशिक्षणाची संधी
कडवई:
देवरूख येथील मयूर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन व संगमेश्वर तालुका क्रिकेट असोसिएशनची मान्यता मिळाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील गुणवंत खेळाडूंना या शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
[कोकणातील झटपट बातम्यां आमच्या पोर्टलवर महालक्ष्मी टाइम्स-महाराष्ट् पोलीस टाइम्स -न्युज 17—जाहिरातीसाठी संपर्क…सचिन पाटोळे-9922749187..
नियाझ खान —9921435330..
दिपक तुळसणकर —9730389876)..
नवीन पत्रकारांना काम करण्याची संधी… संपर्क साधावा… उपसंपादक –मुजीब खान..9860153462].
या शिबिरात खेळाडूंना शास्त्रोक्त व तंत्रशुद्ध पद्धतीने क्रिकेटचे प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाणार आहे. यासाठी अनुभवी प्रशिक्षक तसेच मुंबई आणि रत्नागिरी येथील तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.
या शिबिरासाठी ७ वर्षांपासून वयोगटातील खेळाडूंना सहभागी होता येईल.शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा-मनोहर गुरव: 9890747525,रोशन भाटकर: 7083166693.
संपूर्ण माहिती जाहीर करताना मयूर स्पोर्ट्स अकॅडमी देवरूख व संगमेश्वर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर गुरव यांनी आवाहन केले की, क्रिकेटच्या क्षेत्रात आपली क्षमता दाखवू इच्छिणाऱ्या सर्व गुणवंत खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा.क्रिकेट क्षेत्रातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणासह प्रगत संधी देणाऱ्या या शिबिरामुळे संगमेश्वर तालुक्यातील युवा खेळाडूंना भविष्यातील स्पर्धांसाठी उत्तम मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.