देवरुख:
महाविकास आघाडी, संगमेश्वर तालुक्याच्या वतीने दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी मा. राष्ट्रपती महोदयांना तहसीलदार संगमेश्वर (देवरुख) यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत.
[कोकणातील झटपट बातम्यां आमच्या पोर्टलवर महालक्ष्मी टाइम्स-महाराष्ट् पोलीस टाइम्स -न्युज 17—जाहिरातीसाठी संपर्क…सचिन पाटोळे-9922749187..
नियाझ खान —9921435330..
दिपक तुळसणकर —9730389876)..
नवीन पत्रकारांना काम करण्याची संधी… संपर्क साधावा… उपसंपादक –मुजीब खान..9860153462].
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याच्या गंभीर प्रकरणावर गृहमंत्री आणि संबंधित खासदारांनी तातडीने गृहमंत्री पदाचा आणि खासदारकीचा राजीनामा द्यावा किंवा देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. राज्यसभेमध्ये केलेले वक्तव्य हा बाबासाहेबांचा अपमान असून, तो संपूर्ण भारतीयांसाठी अपमानास्पद आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मा. अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्याशी संसद भवनात भाजप खासदारांनी केलेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचा महाविकास आघाडीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या घटनेत मल्लिकार्जुन खरगे यांना दुखापत झाली असून, संबंधित भाजप खासदारांना पाच वर्षांसाठी निलंबित करावे, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
हे निवेदन महाविकास आघाडीच्या वतीने अशोक जाधव, युयुत्सु आर्ते, नंदादीप बोरुकर, अयुब कापडी, कॅ. हनीफ खलफे, विवेकानंद साळवी, दत्ताराम लिंगायत, मनोज तळेकर, अशोक पवार, रावसाहेब चौगुले, अनिल कांबळे, दिलीप बोलले, मिताली कडवईकर, दिलीप मोहिते, संदीप वेल्हाळ, लांजेकर, अभिजित पाटील, दिलीप बोथले, प्रकाश जाधव, अॅड. सरताज कापडी, दिलीप पेंढारी या कार्यकर्त्यांनी सह्या करून पाठवले आहे.
निवेदनात नमूद केलेल्या मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा महाविकास आघाडीने व्यक्त केली आहे.