कडवई:(दिपक तुळसणकर)
शिंदे आंबेरी गावातील कु. तेजल सुनील शिंदे हिने आपले प्राथमिक शिक्षण जि. प. शाळा शिंदे आंबेरी येथे पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण भाईशा घोसाळकर हायस्कूल, कडवई येथे घेतले, तर उच्च शिक्षण सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे येथे पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने तीन वर्षे डाक विभाग, खेड पोस्ट ऑफिस (BPM) येथे काम केले.
[कोकणातील झटपट बातम्यां आमच्या पोर्टलवर महालक्ष्मी टाइम्स-महाराष्ट् पोलीस टाइम्स -न्युज 17—जाहिरातीसाठी संपर्क…सचिन पाटोळे-9922749187..
नियाझ खान —9921435330..
दिपक तुळसणकर —9730389876)..
नवीन पत्रकारांना काम करण्याची संधी… संपर्क साधावा… उपसंपादक –मुजीब खान..9860153462].
MPSC परीक्षेत यश मिळवून कु. तेजल हिने महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे 13 महिन्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केले. तिच्या मेहनतीने आणि जिद्दीने PSI (पोलीस उपनिरीक्षक) पदावर नियुक्ती मिळवली.
अमरावती शहर पोलीस स्टेशनमध्ये ती PSI म्हणून रुजू झाली आहे. तिच्या या यशामुळे शिंदे आंबेरी गावाला अभिमान वाटत आहे.
आज, शनिवार, 21 डिसेंबर 2024 रोजी तेजल सुनील शिंदे आपल्या गावात आली. तिच्या स्वागतासाठी शिंदे आंबेरी बस स्टॉपपासून गावदेवी मंदिर (शिंदे आंबेरी) ते कडवई गावदेवी मंदिर असा मार्ग असलेल्या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
तिच्या यशामागे काका, काकू, बहीण आणि भाऊजी यांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. तसेच, पोलीस खात्यात काम करण्याची आवड सरांच्या मार्गदर्शनामुळे निर्माण झाली.
“तुमच्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करा आणि सरकारच्या योजनांचा योग्य प्रकारे लाभ घ्या,” असा प्रेरणादायी संदेश तेजल हिने दिला आहे.
तेजलच्या यशामुळे शिंदे आंबेरी गावाला अभिमान वाटत असून, तिच्या मेहनतीचा प्रवास युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
“सिव्हिलियन टू ऑफिसर हा प्रवास कठीण असला तरी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनामुळे अशक्य काहीच नाही.”
गावकरी आणि कुटुंबीय तेजलच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत, आणि तिच्या या यशस्वी वाटचालीचा संपूर्ण गावाला अभिमान आहे.