इचलकरंजीत “गाता राहा मेरा दिल”च्या वतीने रोमँटिक कराओके संध्याकाळ!

इचलकरंजी : विजय मकोटे 

दि :१७: गाता राहा मेरा दिल या सुप्रसिद्ध ग्रुपच्या वतीने व्हॅलेंटाईन डे निमित्त एक सुरेल कराओके संध्या आयोजित करण्यात आली. या संध्याकाळी प्रेमभावनेने नटलेली रोमँटिक हिंदी गीते सादर झाली, ज्या श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेऊन गेली.

 

कार्यक्रमात डुएट आणि सोलो गाण्यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. सुरेल आवाजात सादर झालेल्या गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. कलाकारांच्या सुमधुर स्वरांनी प्रेम, आठवणी आणि नॉस्टॅल्जियाची अनुभूती निर्माण केली.

या संगीतमय सोहळ्याचे यशस्वी आयोजन कांचनमाला भाट, शरद मगदूम, नीता शिंदे आणि शोभा बावधनकर यांनी मेहनतीने पार पाडले. त्यांचे अथक प्रयत्न आणि गायक-गायिकांच्या सुरेल सादरीकरणामुळे हा संध्याकाळ अविस्मरणीय ठरला.

श्रोत्यांनीही प्रत्येक गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत या रोमँटिक संगीतसंध्येचा भरभरून आनंद लुटला. अशा प्रकारच्या संगीतमय मैफिली नियमित व्हाव्यात, अशी रसिकांची मागणी होती. दिपांजली कबाडे यांनी सूत्र संचालन केले

#karaoke song#ichalkaranji#