शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश

यड्राव: कयुम  शेख 

       दि .१८: येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या विभागीय स्तरावरील विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

             वैयक्तिक क्रीडा प्रकारातील यश:

वजन उचलणे (५६ किलो गट): पारस भेंडवडे – विजेता, गणेश तटगुंडी – उपविजेता

भाला फेक: अयान सय्यद – विजेता

उंच उडी: लोकेश निकम – विजेता

थाळी फेक: साक्षी कांबळे – विजेती

लांब उडी: दृष्टी वर्दे – विजेती

            सांघिक क्रीडा प्रकारातील यश:

हॉलीबॉल: मुलींचे संघ – विजेता

टेबल टेनिस: मुलींचे संघ – विजेता, मुलांचे संघ – उपविजेता

तसेच, गोळाफेक, ४०० मीटर धावणे, बुद्धीबळ, कबड्डी, कॅरम यामध्ये संघाने उपविजेतेपद मिळवले.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. क्रीडा विभाग प्रमुख प्रा. शुभम भरमगोंडा, प्रा. सोनाली पाटील तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

या विजयामुळे संस्थेच्या शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता अधोरेखित झाली असून, विद्यार्थ्यांना भविष्यातील क्रीडा स्पर्धांसाठी प्रेरणा मिळाली आहे.

#sports # sharad collage # rajendra yadravkar#