इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि .२१: येथील डायनॅमिक स्पोर्टस् क्लबची खेळाडू कु. वैष्णवी महादेव लवटे हिची मनमाड (नाशिक) येथे होणार्या ३९ व्या किशोर-किशोरी गट कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात निवड झाली आहे. मनमाड येथे २३ फेब‘ुवारीपासून स्पर्धेला सुरुवात होत आहे. स्पर्धेसाठी कु. वैष्णवी ही रवाना झाली आहे.
कु. वैष्णवी लवटे हिला प्रशिक्षक शेखर शहा यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तिला डायनॅमिक स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष संजय कुडचे, भूषण शहा, अतुल बुगड, सोनल बाबर व आई-वडीलांचे प्रोत्साहन लाभत आहे. तिच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.