कुमार विद्या मंदिर, तमदलगे येथे 22 लाखांच्या विकासकामांचे घोडावत समूहाकडून हस्तांतरण

कोल्हापूर: संतोष  कांबळे 

दि.२६ :कुमार विद्या मंदिर, तमदलगे येथे घोडावत कंज्यूमर लिमिटेडच्या सीएसआर फंड आणि संजय घोडावत फाउंडेशनच्या माध्यमातून 22 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यात घोडावत कंज्यूमर लिमिटेडचे एमडी श्रेणिक घोडावत, डायरेक्टर सौ. सलोनी घोडावत, डायरेक्टर राजेश घोडावत, आणि क्वालिटी व सस्टेनेबिलिटी हेड थिप्पेस्वामी पापारेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती.

शाळेच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान

या उपक्रमांतर्गत शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण, कूलिंग सिस्टीम, मैदानाच्या सुविधांचा विकास यांसारख्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. या अत्याधुनिक सुविधांमुळे विद्यार्थी व शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षणाचा लाभ मिळणार आहे.

श्रेणिक घोडावत यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देत अपयशावर मात करून धैर्याने यश संपादन करण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच, डायरेक्टर सौ. सलोनी घोडावत यांनी मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करत घोडावत कुटुंब सतत सहकार्य करत राहील, असे आश्वासन दिले.

ग्रामस्थांकडून घोडावत समूहाच्या कार्याचा गौरव

गावाचे उपसरपंच पुरुषोत्तम शिरसेठ यांनी शाळेच्या विकासासाठी घोडावत कुटुंबाने दिलेल्या योगदानाचे कौतुक केले व भविष्यातही अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. इएसजी मॅनेजर प्रवीण डिग्रजे यांनी “फ्युचर फर्स्ट” या सामाजिक उपक्रमांतर्गत घोडावत कंज्यूमर लिमिटेडने शाळेतील सुधारणा केल्याची माहिती दिली.

या सोहळ्यास शाळेचे मुख्याध्यापक अरुण नागरगोजे, शिक्षकवृंद, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. संजय घोडावत ग्रुपचे चेअरमन व घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत यांनी या उपक्रमाचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमामुळे घोडावत कंज्यूमर लिमिटेडला सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

#sanjay ghodawat#jayshingpur#shrink godawat#