यड्राव, दि १२: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यावतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा बुधवार (ता.१४) रोजी सकाळी १० वाजता निपाणी येथे होणार आहे. येथील आरंभ मल्टीपरपज हॉल, श्री संत बाबा महाराज कॉम्प्लेक्स, नगरपालिका शेजारी, जुना पी.बी. रोड येथे आयोजित केला आहे. या मेळाव्यात जेष्ठ करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
यामध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावांतील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासन व महाविद्यालयाकडून मिळणा-या शिष्यवृत्तींची माहिती, ईडब्ल्यूएस व टीएफडब्ल्यूएस याचा उपयोग प्रवेशासाठी लागणा-या कागदपत्रे सीट डिस्ट्रीव्यशन आणि श्रेणी (कॅटेगीरी) आरक्षण याविषयाची माहीती यावेळी देण्यात येणार आहे. तसेच दहावी, बारावी परिक्षेनंतर महाविद्यालयीन शिक्षण व करिअरची नेमकी दिशा ठरविण्यासाठी हा मार्गदर्शन मेळाव्यात मिळणार आहे
दहावी-बारावीच्या नंतरच्या महाविद्यालयीन प्रवेश, उपलब्ध पर्यायांची माहिती, अभियांत्रिकी, आयटीआय, कृषी पदवी, डिफेन्स, मेडिकल, फार्मसी, एम.बी.ए. यासह विविध क्षेत्रातील करिअरच्या संधीची सखोल मार्गदर्शन या मेळाव्यात मिळणार आहे. त्याचबरोबर विविध महाविद्यालये स्टॉलसह सहभागी होणार आहेत.