विज्ञानवादी बौद्ध धम्म बहुजनांनी अंगिकारणे गरजेचे

अजित कांबळे यांचे प्रतिपादन

शिरढोण : प्रमोद कांबळे

 दि ;१७ विज्ञानवादी प्रज्ञा करूणा न्याय स्वातंत्र समता बंधुता जपणारा बौद्ध धम्म बहुजनांनी अंगिकारणे गरजेचे आहे तरच बहुजन समाज अंधश्रद्धा कर्मकांड यातून मुक्त होवून बहुजनांचे कल्याण होइल असे प्रतिपादन अजित कांबळे यांनी बौद्ध विहार येथे आयोजित ६५ व्या धम्म चक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.ते पुढे म्हणाले; डॉ . बाबासाहे ब आंबेडकर यांनी चिंतन करून दलितांच्या उध्दारासाठी बौद्ध धम्मच उपयोगी आहे असे सांगितले होते यासाठी आपण देखील बौद्ध धम्माचे तत्व आपल्या जीवनात बाळगावे
सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन अविनाश चौताळे व आविनाश काबळे यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर बुद्धवंदना घेण्यात आली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले. कार्यक्रमास पो पाटील अनुराधा जाधव विश्वास शिंगे विलास जाधव राजू कांबळे एकनाथ कांबळे रामचंद्र कांबळे प्रकाश कांबळे संदीप गायकवाड संजय कांबळे बाळासो कांबळे मिलिंद कांबळे आदि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.