इचलकरंजीत मोफत कृत्रिम अवयव मापे घेणे शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

३५० हून अधिक दिव्यांग यांनी घेतला सहभाग इचलकरंजीत रोटरी परिवार व विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमाचे आयोजन

इचलकरंजी :अन्वर मुल्ला 

दि. २८:इचलकरंजी येथे रोटरी परिवार डिस्टिक ३१७०, श्री अग्रसेन सेवा ट्रस्ट, मारवाडी युवा मंच इचलकरंजी, मारवाडी युवा मंच मिड टाऊन, इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम अवयव (आर्टिफिशियल लिंब) मा घेणे प्शिबिराचे आयोजन करण्यात आले.होते या शिबिरास ३५०हून अधिक दिव्यांग नागरिकांनी प्रतिसाद देत उपक्रमाचा लाभ घेतला.हे शिबीर दाते मळा येथील अग्रसेन भवन येथे पार पडले.

या शिबिरासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांमधून दिव्यांग उपस्थित होते. दर दोन वर्षांनी हे शिबिर घेण्यात येते, अशी माहिती आयोजकांनी महालक्ष्मी टाइम्सशी बोलताना दिली. गेल्या दहा वर्षांपासून सदर शिबिर नियमितपणे आयोजित केले जात असून, आतापर्यंत पन्नासहून अधिक शिबिरे घेण्यात आली आहेत. यामधून सुमारे दहा हजार दिव्यांग लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव दिले गेले आहेत.

या शिबिरासाठी आवश्यक असलेले कृत्रिम हात व पाय यांचा मोफत पुरवठा साधू वासवानी मिशन ट्रस्ट, पुणे यांच्यावतीने केला जातो. दरवर्षी दोन शिबिरांचे आयोजन करण्यात येते — पहिल्या शिबिरात अवयवांचे मोजमाप घेणे तर दुसऱ्या शिबिरात त्या मापांनुसार तयार केलेले अवयव बसवण्याची कार्यवाही केली जाते.

शिबिरादरम्यान रुग्णांसाठी मोफत भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी , रोटरी क्लब,ऑफ इचलकरंजी मारवाडी युवा मंच, तसेच साधू वासवानी ट्रस्टचे पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.

हा उपक्रम दिव्यांगांसाठी नवा आत्मविश्वास आणि नवजीवन देणारा ठरला असून, पुढील वर्षीही अधिकाधिक गरजूंपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.यावेळी साधू वासवाणी ट्रस्ट चे श्री. सुंदरलालजी वासवाणी,पन्नालाल डाळ्या ,एस. एन. अगरवाल ,सतीश राठी ,रोटरी क्लब चे अध्यक्ष संजय घायतिडक, घनशाम सावलांनी, संतोष सादले, योगेश मालू ,निवेद धाननिया, प्रकाश लाव्होटी, इनर व्हील च्या क्लब अध्यक्षा सौ. विभा पाटणी. मारवाडी युवा मंच चे अमित राठोड, मिट टाऊन चे अनिता जैन, अग्रसेंन सेवा ट्रस्ट चे श्री. मुरलीघर गोयंका यांच्यासाह पदाधिकारी व सदस्य यानी सहभाग घेतला

#prosthetic limb fitting camp#