इचलकरंजी: विजय मकोटे
दि .१२ : उद्या बुधवार दि. १३ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात स्वरा वीणा प्रस्तुत “मेलोडीयस पंचम” हा सुप्रसिद्ध जादुई संगीतकार आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या बहारदार गीतांच्या कार्यक्रमाचे रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्यआयोजन करण्यात आलेले आहे.
संगीतकार व गायक आर. डी. बर्मन (पंचमदा) यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या गीतांचा हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .साऊंड व लाईट (ध्वनी व प्रकाश) व्यवस्था क्षेत्रामध्ये गेली चार पिढ्यांपासून नामांकित असलेले व हजारो लाईव्ह कार्यक्रमांचा अनुभव पाठीशी असलेले एस. एम. होगाडे जॉबर चे प्रशांत होगाडे व साऊंड इंजिनिअर ऋषिकेश ठाकूर देसाई, स्वरा एंटरटेनमेंट, वीणा म्युझिक क्लास हे या कार्यक्रमाचे निर्माते असून या संगीतमय कार्यक्रमाचे भव्य असे नियोजन करण्यात आले आहे.
नामवंत वादकांच्या संगीत साथीने नीता ठाकूर देसाई,प्रशांत होगाडे, प्रवीण होगाडे, महेश शिंदे व डॉ.दीपक कुंभार हे गायक गीते सादर करणार आहेत. पुण्याच्या प्राजक्ता जोगळेकर या सुप्रसिद्ध निवेदिका या कार्यक्रमाचे आपल्या खास शैलीत निवेदन करणार असून कार्यक्रमात रंगत भरणार आहेत.
कार्यक्रमात संगीत संयोजक विक्रम पाटील, ऋतिक कुरणे, गणेश साळोखे, धीरज वाकरेकर, सर्जेराव कांबळे स्नेहल जाधव, प्रकाश साळोखे, रोहित हंकारे, समर्था होगाडे व विनोद सावंत अशा अनुभवी वादकांची संगीत साथ लाभणार आहे. या कार्यक्रमासाठी श्रीराम टेरिन सेंटर, काजवे फर्निचर्स, डायनोस्टार्स सीएनसी इंजिनियर्स या व इतर प्रायोजकांचे सहकार्य लाभले आहे.