इचलकरंजी: विजय मकोटे
दि .२: स्थानिक कलाकारांच्या अंगभूत कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ असा लौकिक असलेल्या इचलकरंजी फेस्टिव्हलचा बुधवारी (३ सप्टेंबर) शुभारंभ होत आहे. यंदाही नव्या रंगात व नव्या ढंगात स्पर्धा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी यानिमित्ताने शहरवासियांना मिळणार आहे.
इचलकरंजी फेस्टिव्हल ३ ते ५ सप्टेंबर या कालावधीत श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह हे भरविण्यात आले असून बुधवारी दुपारी २ वाजता फेस्टिव्हलचे आकर्षण बनलेल्या इचलकरंजी फेस्टिव्हल श्री शरीरसौष्ठव स्पर्धेने होत आहे. तर सकाळच्या सत्रात अन्नपूर्णा पाककला स्पर्धा होणार आहे. दुपारी २ वाजता आमदार राहुल आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते प्रांताधिकारी दीपक शिंदे, आयुक्त पल्लवी पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक अण्णासाहेब जाधव, पोलिस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत श्रींच्या महाआरतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती फेस्टिव्हलच्या संयोजिका सौ. मोश्मी आवाडे यांनी दिली.
गुरुवार ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जोडी तुझी माझी हा विविध गुणदर्शन स्पर्धा कार्यक्रमतर सायंकाळी ६ वाजता गोल्डन मेलोडीज द ग्रँड म्युझिकल नाईट हा हिंदी, मराठी गीतांचा सुरेल असा गाण्यांचा कार्यक्रम होईल. तर शुक्रवार ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शालेय व महाविद्यालयीन डान्स कॉम्पिटिशन होईल. त्याचबरोबर इचलकरंजी मर्यादीत घरगुती गणेशोत्सव आरास (डेकोरेशन) आणि हातकणंगले तालुका मर्यादीत गौरी सजावट स्पर्धांचा निकाल जाहीर करून बक्षिस समारंभ दुपारी ४ वाजता ना.बा.घोरपडे नाट्यगृहात होणार आहे. यावेळी शेखर शहा, अहमद मुजावर आदी उपस्थित होते.