कबनूर : इंडो किड्स हायस्कूलच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य – लहान मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न

इचलकरंजी,:हबीब शेखदर्जी 

दि. १० :कबनूर येथील इंडो किड्स हायस्कूलच्या आवारात प्रचंड प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना दुर्गंधी, घाणी व डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला असता, प्रशासनाने थेट ग्रामपंचायतीकडे बोट दाखवत जबाबदारी झटकली. त्यामुळे पालक व स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दररोज शेकडो लहान मुले या घाणीमधून शाळेत प्रवेश करतात. अशा परिस्थितीत त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायत व शाळा प्रशासन यांच्या ढकलाढकलीमुळे निष्काळजीपणाचे दुष्परिणाम थेट विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत.

स्थानिक नागरिक व पालकांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन स्वच्छता करून आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याची मागणी केली आहे.