इचलकरंजी : विजय मकोटे
दि .१० : इचलकरंजी शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष कै. मल्हारपंत बावचकर यांच्या १७ व्या स्मृतिदिनानिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमात डॉ. श्रुती जमदग्नी, श्रीमती आशाताई घोरपडे आणि सौ. श्रद्धा बाळण्णावर यांच्या हस्ते प्रतिमापूजन पार पडले. शहर काँग्रेस अध्यक्ष मा. संजय कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना कै. बावचकर मामा यांच्या विचारांना आदर्श मानून त्याच विचारांशी निष्ठा ठेवून कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. तर मा. प्रसाद कुलकर्णी यांनी बावचकर मामांच्या कार्याचा सखोल आढावा घेतला.
या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी शशांक बावचकर, इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष युवराज शिंगाडे, अरविंद धरणगुत्तीकर, किशोर जोशी, रवि वासुदेव, सचिन साठे, राजू किणेकर, प्रवीण फगरे, रमजान शिकलगार, रवि पाटील, अनिल पाच्छिन्द्रे, तौसिफ लाटकर, दिलीप भुई, योगेश कांबळे, दशरथ जावळे, प्रमोद नेजे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.