इचलकरंजी महापालिकेची कारवाई : ज्ञानगंगा एज्यु. सोसायटीचे अतिक्रमण हटवले

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि.१० : इचलकरंजी महानगरपालिका मालकीच्या जुना चंदूर रोड, दुर्गामाता मंदिराजवळील रिव्हिजन सर्वे नंबर ४०७, हिस्सा क्रमांक 1अ मधील खुल्या भूखंडावरील ज्ञानगंगा एज्यु. सोसायटीचे अतिक्रमण आज दिनांक १०  सप्टेंबर २०२५ रोजी महापालिकेने ताब्यात घेतले.

ही कारवाई मा. आयुक्त श्रीमती पल्लवी पाटील, उपायुक्त नंदू परळकर व सहायक आयुक्त विजय राजापुरे यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्तात करण्यात आली. जागा ताब्यात घेताना काहीसा विरोध व किरकोळ वादविवाद झाला.

कारवाईत महापालिकेच्या नगररचना विभागातील सहायक नगररचनाकार अविनाश बन्ने, हरिशचंद्र पाटील, अमरजित लकडे, भूमापक अनिल सुतार, सावकार चौगुले तसेच मिळकत विभागाकडील अधीक्षक श्रीकांत पाटील, वरिष्ठ लिपिक सदाशिव गोनुगडे, लिपिक अनिल पाटील, कोर्ट विभागातील विधी अधिकारी अॅड. भावना देवडा, वरिष्ठ लिपिक कृष्णा आवळे, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे व महापालिकेचे अन्य कर्मचारी सहभागी होते.

महानगरपालिकेकडून बुधवार,१०  सप्टेंबर २०२५ रोजी ही अतिक्रमण हटविण्याची कारवाई पार पाडण्यात आली.