पांडुरंग म्हातुकडे यांची भाजप जेष्ठ नागरिक आघाडी कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड

जनसंघापासून भाजपपर्यंत सात दशकांची राजकीय सेवा; सत्याग्रह, तुरुंगवास आणि पक्ष संघटनात मोलाचे योगदान

इचलकरंजी:विजय मकोटे 

दि  १९: इचलकरंजी येथील भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते पांडुरंग बाबुराव म्हातुकडे यांची भाजप जेष्ठ नागरीक आघाडी कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.

दीर्घ राजकीय कारकिर्दीचा सन्मान

पांडुरंग म्हातुकडे हे १९६० पासून जनसंघामध्ये सक्रिय असून,१९६५ साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील कच्छ सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच१९७१ च्या बांगलादेश मान्यता सत्याग्रह आणि १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात४१ दिवसांचा तुरुंगवास ही त्यांची लढवय्यी भूमिका विशेष उल्लेखनीय आहे.

ते जनसंघात इचलकरंजी शहराध्यक्ष, शहरमंत्री, जिल्हा उपाध्यक्ष अशा जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर भारतीय जनता पक्षातही शहर उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत राहिले आहेत.

सन्मानाचे प्रमाणपत्र खासदारांच्या हस्ते

या निवडीबद्दलचे प्रमाणपत्र खासदार धनंजय महाडिक, भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकरमाजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भविष्यातील मार्गदर्शनासाठी अनुभवाची साथ

पांडुरंग म्हातुकडे यांच्या निवडीमुळे भाजपच्या जेष्ठ नागरीक आघाडीला अनुभवसंपन्न नेतृत्व लाभणार असून, पक्ष संघटन बळकट करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे. त्यांच्या निवडीसाठी आमदार राहुल आवाडे यांचेही सहकार्य लाभले.