इचलकरंजी जनता सहकारी बँकेला जिल्ह्यातील सर्वोत्तम बँकेचा पुरस्कार

कल्याण्णा आवाडे यांना सन्मान

इचलकरंजी :विजय मकोटे 
दि.३ : सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये अविरतपणे कार्यरत राहून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या इचलकरंजी जनता सहकारी बँकेला कोल्हापूर जिल्हा बँक्स असोसिएशनमार्फत जिल्ह्यातील सर्वोत्तम बँकेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात बँकेने तब्बल ५०७ कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय करून उल्लेखनीय प्रगती साधली आहे.हा पुरस्कार नुकत्याच झालेल्या सोहळ्यात कोल्हापूर येथे असोसिएशनचे चेअरमन मा. विनय काकडे, उपाध्यक्ष श्री चिट्टळे माडगुळकर, तसेच संचालक मंडळाच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन कल्याण्णा आवाडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी संचालक मंडळाचे सदस्य, व्यवस्थापक, अधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते.

कल्याण्णा आवाडे म्हणाले की, “पारदर्शक कारभार, सोहादार्पण सेवा, ग्राहकांचा विश्वास आणि उद्योजकांना दिलेला आर्थिक हातभार यामुळेच ही प्रगती साधता आली. शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक तसेच सर्वसामान्यांचे बँकेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते हेच यशाचे गमक आहे.”

ग्राहकांच्या सर्व गरजा व निकड पूर्ण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब बँकेने केला आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या तोडीस तोड सेवा आणि सुविधा देऊन बँक जनतेच्या मनात आपली खास ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.

या प्रसंगी बँकेचे संचालक सर्वश्री बंडोपंत लाड, रमेश पाटील, श्रीशैल किल्लूर, महेश सातपुते, गंगाराम पाटील, सचिन देवकळसकर, बाबूराव पाटील, अविनाश कांबळे, शैलेश गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय शिरगावकर यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते