शहापूर : अन्वर मुल्ला
दि.५ : शहापुर येथील सावली सोसायटी परिसरात एका तरुणावर आठ जणांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सर्वजण पोलिसांच्या ताब्यात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरमान रझाक नायकवडी (वय २३ रा. सावली सोसायटी, शहापुर, ता. हातकणंगले) हे पेंटिंगचे काम करतात. दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ते त्यांच्या घराजवळ उभे असताना, त्यांचा मित्र अमोल हिरेमठ याने त्यांना “अजित भंडारेने समाधान बारजवळ बोलावले आहे” असे सांगितले.
यानंतर अरमान नायकवडी हे तेथे गेले असता आरोपी अजित भंडारे, निलेश पारटे, विनायक शेवाळे, अमोल हिरेमठ, ओंकार सोनवणे, राकेश पाटील, संकेत माडंवकर आणि अक्षय नरके (सर्व रा. सावली सोसायटी व गणेशनगर, शहापुर) यांनी एकत्रित येऊन “तुला खूप मस्ती आली आहे” असे म्हणत त्याच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांनी त्याच्या हातातील मोबाईल फोन फोडला व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या घटनेनंतर फिर्यादीने शहापूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी भा. न्या. संहिता कलम 115(2), 324(4)(5), 189(2), 191(2), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास पो.हे.कॉ. 1291 कोरे हे करीत आहेत.
घटनेची ठळक वैशिष्ट्ये:
मारहाणीची वेळ: रात्री ९.३० वा., दिनांक ४ ऑक्टोबर २०२५
ठिकाण: समाधान बार परिसर, शहापूर
आरोपी संख्या: ८
फिर्यादी: अरमान रझाक नायकवडी, वय २३
गुन्हा नोंदविणारे अधिकारी: मपोहेकॉ १४६८ झुगर
तपास अधिकारी: पो.हे.कॉ. १२९१ कोरे