इचलकरंजी -विजय मकोटे
दि .१० : बिल्डर्स डे च्या निमित्ताने बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटर इचलकरंजी व आदी स्टिल यार्ड यांच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ठ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर प्रल्हाद माने यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर यंदाचे गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये चंपालाल मालविया (फरशी फिटिंग), जगदीश जांगिड (सुतार), धनंजय कुलकर्णी (पेंटर आतील), सतीश माने (पेंटर बाहेरील), निखिल महाजन (प्लंबर), संजय माने (फॅब्रिकेशन), चंद्रकांत सस्ते (बांधकाम गिलावा) आणि जगदीश हिरेमठ (सेंट्रींग) यांचा समावेश असल्याची माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटर इचलकरंजीचे चेअरमन फैय्याज गैबान, ट्रस्टचे प्रेसिडेंट नितीन धुत, शितल काजवे व राजेंद्र शिंत्रे यांनी दिली.
बांधकाम क्षेत्राचे महत्वाचे घटक असणार्या या बांधकाम कामगारांना गौरविण्यात येते. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटर इचलकरंजी यांच्या वतीने बिल्डर्स डे चे औचित्य साधत गुणवंत कामगारांचा पुरस्कार देऊन सत्कार केला जातो. यंदाच्या पुरस्कारासाठी रमेश मर्दा, सुहास अकिवाटे व महांतेश कोकळकी यांच्या त्रिसदस्यीय समितीने शहर व परिसरातील माहिती जाणून घेत पुरस्कारांसाठी नांवे निश्चित केली आहेत.
हा पुरस्कार वितरण सोहळा लायन्स ब्लड बँक येथे शनिवार ११ ऑक्टोबर रोजी आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते आणि बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे. याप्रसंगी बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य चेअरमन जगन्नाथ जाधव यांच्या हस्ते निर्देशिकाचे प्रकाशन होणार आहे. तर बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाचे राज्य ट्रेझरर राजेंद्र गांधी, सेक्रेटरी मनोज देशमुख, माजी स्टेट चेअरमन दत्ता मुळे, माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रताप साळुंखे आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
यावेळी दिलीप पटेल, रमेश मर्दा, तानाजी हराळे, पुंडलिक जाधव, भगवान कांबुरे, संजय रुग्गे, मोहन सातपुते, शिवकुमार हिराणी, विकास चंगेडीया, सुधीर लाटकर, श्रीकांत लासकर आदी स्टिल यार्डचे अरुण चौगुले आदी उपस्थित होते.