इचलकरंजी: विजय मकोटे
दि.२५: आचार्यश्री आनंद युवा मंचतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गरजू कुटुंबांची दिवाळी आनंदाने साजरी व्हावी या उद्देशाने कुछ पल गरीबों के लिए विशेष उपक्रम राबविण्यात आला. यानिमित्ताने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, माजी नगरसेवक दिलीप मुथा यांच्या हस्ते गरजू कुटुंबियांना फराळ साहित्य व कपड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रितम बोरा यांचा वाढदिवस या सर्वांसोबत साजरा करण्यात आला.
अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या मार्गदर्शनाखाली मागील सहा वर्षांपासून मंचतर्फे समाजोपयोगी कार्य केले जात आहे. या उपक्रमांतर्गत सर्वसामान्यांच्या घरात वापरात नसलेले पण चांगल्या अवस्थेतील कपडे गोळा करून आनंदगुरु मोफत चपाती भाजी सेवा केंद्रामार्फत गरजूंपर्यंत पोहोचवले जातात. या सेवाकार्यात रितेश चोपडा, आदेश कटारिया, पंकज बाबेल, सुमतीलाल शहा आदी सदस्य मेहनत घेतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रकाशलाल, प्रितम, प्रफुल्ल व प्रशांत बोरा परिवाराकडून रोटी-सब्जी बरोबर फराळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जितेंद्र जैन, योगेश चोपडा, करण मुथा आणि सेवाभावी सदस्य उपस्थित होते. यावेळी अशोक गोमचंद सालेच्या यांच्या परिवारातर्फे सेवा देण्यात आली