बालाजी करियर डेव्हलपमेंट अकॅडमी (लातूर पॅटर्न) चे उद्घाटन संपन्न

इचलकरंजी- मनोज खेतमर

दि: २३ बालाजी करियर डेवलपमेंट अकॅडमी (लातूर पॅटर्न) चे उद्घाटन माननीय श्री राजेंद्र निंबाळकर (सर) सचिव पालक शिक्षक संघटना यांचे शुभ हस्ते आणि मा. श्री मदन कारंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन मा श्री .राजेंद्र निंबाळकर ,मा श्री मदन कारंडे  ,प्राचार्य जगपाल काळे सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.प्रा. प्रदीप पाटील सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच बालाजी करियर डेवलपमेंट अकॅडमी (लातूर पॅटर्न) च महत्व विशद केले.

प्राचार्यश्री जयपाल काळे सर यांनी बालाजी करियर डेव्हलपमेंट अकॅडमी च्या माध्यमातून अभ्यासक्रम, नियोजन, मेडिकल इंजीनियरिंग प्रवेशासाठी घ्यावयाच्या काळजीचे आपल्या भाषणातून महत्त्व विशद केले .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेंद्र निंबाळकर सर यांनी अकॅडमी च्या पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना कष्टाचे फळ मिळणार नाही हे स्पर्धेचे युग आहे व आपणास त्यात टिकायचे असेल तर ते काही असेल तर खूप परिश्रम घेणे घेणे आवश्यक आहे असे अनमोल मार्गदर्शन आपल्या भाषणातून केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मदन कारंडे साहेब यांनी शिक्षक विद्यार्थी व पालक यांना येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करता आले पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांनी दिवसरात्र एक करून महिन्यात करावी असे प्रतिपादन केले.

यावेळी कार्यक्रमासाठी श्री दादा लाड सर , मा श्री गौरी कारंडे मॅडम, मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमासाठी उपस्थित होते . तसेच या कार्यक्रमामध्ये प्रा .संजय पाटील सर यांनी आभार मानले तर ज्ञानेश्वर नारायणकर सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.