जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा

सांगली: अय्यन पटेल 

दि. २६ : भारतीय संविधानास ७५ र्षे पूर्ण झाल्यानिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संविधान स्तंभाजवळ संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे,अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी रघुनाथ पोटे आणि विवेक काळे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अशिष फुलुके, तहसिलदार लीना खरात यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.