श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात….

इचलकरंजी : हबीब शेख दर्जी 

दि २६ : भारतीय संविधानाला ७६ वर्ष पूर्ण झाल्या निमित्त श्रीमंत गंगामाई गर्ल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधानाचे कीर्तन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी रत्नदीप हायस्कूल गंगानगर येथील मुख्याध्यापक सुनील स्वामी व त्यांचे सहकारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सदर कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत गंगामाईच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व संविधान प्रतिमेस अभिवादन करून झाली.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका व्हि. एस.लोटके यांनी केले .त्यांनी आपल्या मनोगतातून संविधानाचे महत्त्व स्पष्ट केले.तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए एस. काजी मॅडम यांनी प्रमुख पाहुण्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले सौ ए. ए. रानडे यांनी संविधान उद्देशिकांचे विद्यार्थिनी कडून सामूहिक वाचन करून घेतले.पर्यवेक्षक एस एस कोळी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रमुख पाहुण्यांनी जय संविधान जय जय संविधान अशा पंक्तीने व आपल्या कीर्तनाने मनोगतास सुरुवात केली. त्यांनी आपल्या भारताचा प्राण म्हणजे संविधान असे कीर्तनातून प्रकट करत संविधानाचे महत्त्व व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संवेदनाप्रति असलेले योगदान संविधानाचा अर्थ,हक्क,अधिकार, कायदे यांची माहिती दिली.या संविधानामुळेच न्याय ,स्वातंत्र्य, समता,बंधुता,मानवता इ. हक्क प्राप्त झाले याचे मार्गदर्शन केले.अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए.एस. काजी यांनी संविधानाच्या संदर्भात हक्क व जबाबदारी यांचे मार्गदर्शन केले.खाते प्रमुख आर एन हरेल यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन एस जी माने यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.