उर्दू विद्या मंदिर इंगळीला मुल्ला व पट्टेकरी परिवाराची ७० हजारांची उदार देणगी

इंगळी: अर्चना कांबळे 
दि .२६ : उर्दू विद्या मंदिर इंगळी शाळेला मुल्ला व पट्टेकरी परिवाराकडून तब्बल रु. ७०,०००/- किमतीचे साहित्य स्वरूपात उदार देणगी प्रदान करण्यात आली. उर्दू इंगळी शाळेच्या अध्यापिका सौ. तबस्सुम मुल्ला यांच्या विशेष प्रयत्नातून ही मदत मिळाली.

शाळेला मिळालेली देणगी पुढीलप्रमाणे —

1. कलर प्रिंटर – सिकंदर अन्वर मुल्ला (पठ्ठणकोडोली) 2. ऑफिस टेबल – सौ. शबाना शमशुद्दीन पट्टेकरी (बागणी, जि. सांगली) 3. लोखंडी कपाट – डॉ. इमरान शमशुद्दीन पट्टेकरी 4. प्रोजेक्टर – सौ. तबस्सुम सिकंदर मुल्ला

शाळेच्या वतीने सिकंदर अन्वर मुल्ला व सौ. तबस्सुम सिकंदर मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक रईस पटेल, इंगळी ग्रामपंचायत सदस्या सुमैया जब्बार नायकवडे, माजी सरपंच बाळासो नायकवडे, हाफिज सुहेल नायकवडे, तबस्सुम मुल्ला, साजिद पटेल, समीर मुल्ला, शगुफ्ता पटेल, सादिया नायकवडे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

शाळेला मिळालेल्या या मौल्यवान देणगीमुळे शैक्षणिक सुविधांचा अधिक विकास होऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत सकारात्मक बदल घडणार असल्याची भावना व्यक्त होत आ