इचलकरंजी :मनोज खेतमर
दि :ज्येष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे प्रणित भ्रष्ट्राचार विरोधी जनआंदोलन न्यास राळेगणसिद्धी या संस्थेची इचलकरंजी शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.माहिती अधिकार कायदा,ग्रामसभा,दफ्तर दिरंगाई कायदा,दारूबंदी सदर कायद्याचे प्रबोधन करून मतदान जनजागृती मोहीम राबवणे यासाठी निस्वार्थी सामाजिक कार्यकर्त्याचे संघटन करण्याच्या हेतूने इचलकरंजी शहर कार्यकारिणीत अध्यक्षपदी अभिजित पटवा,उपाध्यक्ष पदी आप्पासाहेब पाटील,सेक्रेटरीपदी मन्सूर अत्तार, खजिनदार पदी हरीश देवाडिगा यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य राजु कोंन्नूर,दिपक जाधव,जतीन पोतदार,सुधाकर सटाले,सुनिल भाकरे,महेंद्र जाधव,अमोल ढवळे यांची निवड करण्यात आली आहे.ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीत भ्र.वि. जनआंदोलन न्यासाचे शरद मिराशी तसेच जिल्हा संघटक नारायण पवार यांच्याउपस्थितीत सदर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.