कबनूर:-हबीब शेखदर्जी
दि:-१२ येथील स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी संचलित इंडो इंग्लिश हायस्कूल चा 24 वा वार्षिक स्नेहसंमेलनात ते बोलत होते.
“सध्या समाजामध्ये वाईट प्रवृत्ती आणि गुन्हेगारी वाढली आहे अशावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना फक्त शिक्षणावर मन केंद्रित करून वाईट प्रवृत्ती पासून दूर राहावे” असे माननीय श्री. डी. एस. हातरोटे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केलेल्या देशभक्ती गीतामध्ये मानवता,सर्वधर्मसमभाव आणि सदाचाराचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाचे कौतुकही केले. राज्य शैक्षणिक संशोधक प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी यांचा स्वातंत्र्यलढ्याचा संपूर्ण इतिहास असलेल्या” गाथा क्रांतिवीरांची” या पुस्तकाच्या 70 हजार प्रती प्रकाशित झाल्या त्याच निवड समितीमधील सदस्य डॉक्टर मा. श्री. मा.ग. गुरव आणि लेखक प्राध्यापक श्री. रवींद्र पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ,देऊन जिल्हा सत्र न्यायाधीश हातरोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत संस्थेच्या चेअरमन श्री. एन एन. काझी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. वार्षिक सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार प्राप्त झालेला पूर्व प्राथमिक चा विद्यार्थी बाले खान आर्षद नासिर, सय्यद हापसा सादिक,प्राथमिक चा अजगर जियान जावेद,बागी आलिया फिरोज, माध्यमिक सुतार जुवेरिया जमीर, अफरोज उमर अल्ताफ, मोमीन रेहान फिरोज,काले आयेशा मुनीर, या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर करून आपले कला गुण व कौशल्य सर्वासमोर सादर केले.मुख्याध्यापिका सौ. नाझिया नवाब यांनी शालेय वार्षिक आढावा चे वाचन केले.या कार्यक्रमास संस्थेचे सर्व पदाधिकारी गावच्या प्रथम नागरिक मा. सौ सुलोचना कट्टी( सरपंच ग्रामपंचायत मौजे,कबनूर) सौ.अर्चना पाटील ग्रामपंचायत सदस्य श्री. इम्रान डफेदार( उद्योगपती), मा.श्री. रिजवान चमन शेख (राज्याध्यक्ष उर्दू शिक्षक संघटना) मा.श्री.जावेद फकीर( उद्योगपती) मा. श्री. जावेद मुजावर (उद्योगपती) मा. श्री जहागीर पटेकरी (माजी नगरसेवक )आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार मा. श्री शहानुर कमालशा यांनी मानले तर सूत्रसंचालन सौ.रुकसाना खान, राजश्री साळुंखे,मीना डाके यांनी केले.