गंगामाई स्पोर्ट्सच्या दोन खेळाडूंची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि.१९:  येथील गंगामाई स्पोर्ट्सच्या कु. श्रावणी दत्तात्रय मळोद आणि कु. मानसी चंद्रकांत माने यांची वाशी, मुंबई येथे शनिवारपासून होणाऱ्या १८ वर्षाखालील राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागातून निवड झाली आहे.कु. श्रावणी मळोद आणि कु. मानसी माने यांनी आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण व चमकदार कामगिरी केली असून, त्यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावरच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. या दोन्ही खेळाडूंना प्रशिक्षक शेखर शहा, बी. ए. माने आणि के. ए. पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.तसेच मुख्याध्यापिका सौ. ए. एस. काजी, उपमुख्याध्यापिका सौ. व्ही. एस. लोटके, उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी आणि पर्यवेक्षक एस. एस. कोळी यांचे मोलाचे प्रोत्साहन त्यांना मिळत आहे.

या यशाबद्दल संस्थेचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, चेअरमन कृष्णा बोहरा, व्हाईस चेअरमन उदय लोखंडे, ट्रेझरर महेश बांदवलकर, मानद सचिव बाबासाहेब वडींगे, स्कूल कमिटी चेअरमन मारुतराव निमणकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व विश्वस्तांनी कु. श्रावणी मळोद आणि कु. मानसी माने यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.