प्रलंबित अर्ज तात्काळ मार्गी लावावेत :अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे

रत्नागिरी: नियाज खान

दि.५: ज्या विभागाकडे अर्ज प्रलंबित आहेत, ते तात्काळ मार्गी लावावेत, असे निर्देशअपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज लोकशाही दिन झाला. यावेळी अपर पोलीसअधिक्षक बाबुराव महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, अन्न व औषधचे सहाय्यक आयुक्त शशिकांत यादव, जिल्हासैनिक कल्याण अधिकारी प्रविंद्र बिरादार आदी उपस्थित होते.


अपर जिल्हाधिकाऱ्यांनी मागील प्रलंबित अर्जांचा आढावा घेतला. नव्याने दाखल अर्जांबाबत कायकार्यवाही केली याबाबतही संबंधित विभागाने अहवाल देण्याबाबत सांगितले. मागील प्रलंबित अर्जांचीसंबंधित विभागाने निर्गती करावी, असे अपर जिल्हाधिकारी श्री. गलांडे म्हणाले.आजच्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हास्तरीयजात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय, जिल्हा नियोजन कार्यालय, रत्नागिरी प्रांत कार्यालय, जिल्हा पुरवठाकार्यालय आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडील प्रत्येकी 1 असे एकूण 7 अर्ज दाखल झाले आहेत.