इचलकरंजी: विजय धुत्रे
दि.२९ जुलै २०२६ : महानगरपालिकेच्या वतीने आज बुधवार दि. २९ जुलै रोजी नरवीर शिवा काशिद यांच्या पुण्यतीथी निमित्त ( तिथीनुसार) महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्या हस्ते आणि उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त अशोक कुंभार, नगरसेवक सयाजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सहा. आयुक्त नितिन बनगे यांचेसह इचलकरंजी नाभिक समाजाचे अध्यक्ष सुनील इंगळे व श्री बाबुराव जाधव, रवीद्र क्षीरसागर ,भारत मर्दाने, कृष्णात साळोखे, जनार्दन सूर्यवंशी, जयसिंग संकपाळ, हिंदुराव राऊत, मारुती काशीद, आनंदा कीर्तने, बाळासो पवार, सुरेंद्र सपकाळ, नेताजी सपकाळे, प्रवीण जाधव,अर्जुन शिंदे,प्रमोद शिंगे, बापू सपकाळ, प्रकाश जाधव ,दादासो साळुंखे,विनायक चव्हाण, अमोल साळुंखे, सिद्धांत जाधव ,गणेश टिपुगडे, संतोष म्हेत्रे, तुषार जगताप, बळवंत चव्हाण, योगेश पवार , दिपक जाधव, विनय यादव, संजय सपकाळ, कपिलदेव डिग्रजकर, अरुण साळोखे ,हर्षद साळुंखे , अमर इंगळे, बंटी शिंगे,राहुल डिग्रजकर , पप्पू काशीद, प्रणव साळुंखे, रोहित इंगळे तसेच इचलकरंजी शहर व परिसरातील नाभिक समाजबांधव मोठ्या संख्येने आज उपस्थित होते.