दानोळीच्या युवराज पाटील यांना तालुका आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

कोल्हापूर डिस्ट्रीक्स रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनकडून रविवारी प्रदान

दानोळी: प्रतिनिधी

दि.६: दानोळी येथील पत्रकारयुवराज पाटीलयांनाकोल्हापूर डिस्ट्रीक्स रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनच्यावतीनेशिरोळ तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील पत्रकारितेला नवी दिशा देणाऱ्या त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात येत आहे.

       हा पुरस्कार रविवार (ता. ११) रोजी संजय घोडावत विद्यापीठअतिग्रे (ता. हातकणंगले) येथे आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभास खासदार शाहू छत्रपती महाराज अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असूनजेष्ट संपादक सम्राट फडणीस (पुणे) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.युवराज पाटील हे गेली २२ वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असूनत्यांनी दानोळीसारख्या ग्रामीण भागातून सातत्याने निर्भीडअभ्यासपूर्ण आणि समाजभान जपणारी पत्रकारिता केली आहे. पर्यावरणपाणथळ क्षेत्रेपक्षी व जैवविविधता संवर्धन यासारख्या दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी केलेले लेखन विशेष उल्लेखनीय ठरले आहे. विशेषतः पाणथळ क्षेत्रांवरील वृत्तमालिका ही राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती.यासोबतच त्यांनी शेती व शेतीतील नवे प्रयोगशेतीसमोरील प्रश्नशेतकऱ्यांच्या व्यथा-वेदनापिकेहवामानातील बदल व त्याचे शेतीवर होणारे परिणाम याविषयी सातत्याने सखोल मांडणी केली आहे. नदीपाणीटंचाईबंधारेधरणग्रस्तांचे प्रश्न तसेच त्यांच्या आंदोलनांविषयी केलेल्या लेखनातून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.याशिवाय शैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक, धार्मिक व साहित्यिक विषयांवरही त्यांनी संवेदनशील आणि वस्तुनिष्ठ पत्रकारिता केली आहे. पत्रकारितेबरोबरच छायाचित्रणाची आवड जोपासत त्यांनी टिपलेली अनेक लक्षवेधी छायाचित्रे विविध माध्यमांत प्रसिद्ध झाली आहेत.