स्वर्गीय सुधाकरावजी मणेरे यांची जयंती उत्साहात साजरी

इचलकरंजी: विजय मकोटे
दि.७: श्री डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे संस्थापक स्वर्गीय श्री. सुधाकरावजी मणेरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शितलकुमार मणेरे, सेक्रेटरी मा. श्री. अनिलकुमार मणेरे, उपाध्यक्ष मा. श्री. सुभाष केटकाळे, संस्थेचे सदस्य मा. श्री. प्रेम मणेरे, मा. श्री. सन्मान मणेरे, मा. सौ. ज्योती शितलकुमार मणेरे, मा. सौ. साक्षी अनिलकुमार मणेरे, मा. श्री. मधुकर मणेरे, मा. श्री. अरुण मणेरे तसेच संस्थेचे समन्वयक मा. श्री. अशोक वसगडे उपस्थित होते.मा. श्री. मधुकर मणेरे यांच्या हस्ते स्वर्गीय श्री. सुधाकरावजी मणेरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाच्या वतीने त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी स्मरण खेळ, मेहंदी, चित्रकला, हस्ताक्षर, बुद्धिबळ तर पालकांसाठी पाककला व संगीत खुर्ची या स्पर्धा घेण्यात आल्या. माजी विद्यार्थिनी भाग्यश्री कोपार्डे हिने रांगोळीतून स्वर्गीय मणेरे यांचे चित्र साकारले.या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धांतील विजेते तसेच होमी भाभा, गणित प्रज्ञा, विज्ञान प्रज्ञा आणि एम.टी.एस.ई. स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वर्गीय श्री. सुधाकरावजी मणेरे यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री. निवास तोडकर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. वैशाली पाटील यांनी तर आभार सौ. सुधा शिलेदार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पा ऐनापुरे, मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. वैशाली मंगसुळे, सर्व शाखांचे विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.