उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज तारदाळ-खोतवाडी येथे रोड शो

इचलकरंजी: विजय मकोटे
दि.३१: कोरोची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने रविवार १ फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तारदाळ येथे येत आहेत. रविवारी सायंकाळी ६.३० वाजता तारदाळ-खोतवाडी येथे रोड शोचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली.
        कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपा महायुतीतर्फे कु. सानिका राहुल आवाडे, कोरोची पंचायत समिती मतदारसंघात सुमेध उर्फ सनी ओऊळकर आणि तारदाळ पंचायत समिती मतदारसंघात सौ. प्रियांका प्रविण खोबरे हे निवडणूक लढवत आहेत. तिन्ही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर नजीकच्या चंदूर, कबनूर, पट्टणकोडोली मतदारसंघातही महायुतीने मुसंडी मारली. या सर्वच उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवार १ फेब्रुवारी रोजी तारदाळ येथे येत आहेत. यावेळी उमेदवारांच्या प्रचारार्थ रोड शो चे आयोजन करण्यात आल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.