मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेअंतर्गत कोविड लसीकरणाचे आयोजन

कोल्हापूर:प्रतिनिधी

    दि. 28  जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व उच्च व तंत्रशिक्षण विभागअंतर्गत अशोकराव माने पॉलिटेक्निककॉलेजमध्ये तंत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेअंतर्गत कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.

लसीकरण सत्राचे दीपप्रज्वलन अंबपचे जिल्हा परिषद सदस्य मनीषा माने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई, माने पॉलीटेक्निक कॉलेजचे प्राचार्य युवराज गुरव, प्राथमिक आरोग्य केंद्र भादोलेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माहेश्वरी उंब्रजकर, आरोग्य सहाय्यक श्री. साळवी, श्री. पाटील, पूजा घाडगे समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका यांनी या सत्राचे नियोजन केले होते. या सत्रात एकूण 67 विद्यार्थ्यांनी कोविडलसीचा डोस घेतला.