इचलकरजी: हबीब शेखदर्जी
दि.७:शहरातील कोल्हाटी समाजाच्या स्मशानभूमीतील मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित कामे तात्काळ पूर्ण न झाल्यास अखिल महाराष्ट्र कोल्हाटी समाज संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेविका प्रमिला जावळे व रवी जावळे यांनी दिला आहे.
कोल्हाटी समाजाच्या स्मशानभूमीतील संरक्षण भिंतींचे व हॉल चे काम झाले असून स्मशानभूमीत समाजाच्या नावाची कमान, प्रवेशद्वार व दहन कट्टा अद्याप उभारण्यात आलेला नाही. तसेच नुकत्याच झालेल्या काही बांधकामाची विघ्नसंतोषी लोकांकडून नासधूस करण्यात आली आहे. या संदर्भात अखिल महाराष्ट्र कोल्हाटी समाज संघटनेच्या वतीने ऑक्टोबर २०२३ मध्ये निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यावर आजतागायत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे अंत्यविधी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी स्मशानभूमीतील प्रलंबीत कामे व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. कामे तात्काळ पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलं.
यावेळी शांताराम लाखे, अशोक लाखे, प्रताप लाखे , भोपाल लाखे, बबन जावळे, पवन लाखे, विनायक जावळे, गुरु लाखे, सर्जेराव जावळे,, विठ्ठल जावळे, भगवान लाखे, धमपाल जवळे, बाबा लाखे, अशोक लाखे, संतोष लाखे, आनंदा लाखे, रुबन जावळे, दगडू लाखे, रंगा लाखे, सचिन जावळे, विनायक जावळे, संजय लाखे, भीमा लाखे, विशाल लाखे, अक्षय जावळे, मोहन लाखे यांच्यासह समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.