इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.७: श्री. डी.ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमाई बालमंदिर, प्राथमिक विद्यालय, मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच कुसुम ऑलिंपियाड यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. िेप्पा आप्पा मणेरे (पापा) यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष केटकाळे यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात पापा यांच्या कार्याचा व चरित्राचा आढावा घेत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शीतलकुमार मणेरे, अदिलकुमार मणेरे, समन्वयक अशोक िसर्डे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका पुष्पा ऐतापरे, कॉलेज प्राचार्या वैशाली मंगसुळे यांच्यासह विविध विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.