आरवली:-सचिन पाटोले
दि : 30 संगमेश्वर नजीकच्या आंबेडखुर्द येथे 29 ऑक्टोबर रोजी कुणबी भवन पायाभरणी समारंभात मोठ्या उत्साहात व दणक्यात पार पडला.यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या भाषणात कुणबी समाजाच्या प्रलंबीत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करूच शिवाय समाज भवनासाठी भरभरून योगदान देण्याचे आश्वासन दिले.
मुंबई ते गोव्याच्या दरम्यान संगमेश्वर येथे राष्ट्रीय महामार्गालगत(शास्ञी पुल)येथे कुणबी समाजाचे सुसज्ज भवन उभारण्यात येत आहे. सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करून भव्यदिव्य भवन उभे राहणार आहे. याचे भूमिपूजन आज सकाळी समाजाचे नेते सहदेव बेटकर यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारी पायाभरणी सोहळ्याला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. या सोहळ्याला साडे बहात्तर खेड्यातील कुणबी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
तसेच कार्यक्रमाला उपस्थित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे,पालकमंञी अनिल परब,खाजदार विनायक राऊत,मंञी उदय सामंत,माजी खाजदार हुसेन दलवाई,आमदार शेखर निकम,राजन साळवी,योगेश कदम,जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव,शिवसेना जिल्हा प्रमुख विलास चाळके,सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक, काँग्रेस जिल्हाअध्यक्ष अविनाश लाड,माजी आमदार सुभाष बने,संदानंद चव्हान, हुस्नबानु खलपे, जि.प.सदस्य रोहन बने,रचना महाडीक,माधवी गीते,सभापती जया माने.तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुणबी समाजाचे नेते सहदेव बेटकर,संतोष थेराडे,विजय कुवळेकर,दत्ताराम लांबे,कृष्णा हरेकर व समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.