इचलकरंजी:विजय मकोटे
दि :१ नोव्हेंबर चित्रपट व टीव्हीवरील मालिका या समाजाचे मनोरंजन करण्याबरोबरच प्रबोधन घडविणाऱ्या अविभाज्य अंग बनल्या आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार व कलाकारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडी सदैव त्यांच्या पाठीशी उभी आहे, असे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केले.
यावेळी भाजपा चित्रपट कामगार आघाडी कोल्हापूर जिल्हा चिटणीस पदी प्रा. मिलींद दांडेकर, अरुण दळवी यांची तर हातकणंगले तालुका अध्यक्षपदी मनीष आपटे, उपाध्यक्ष पदी अण्णासो महेकर, सरचिटणीस पदी केदार कुलकर्णी, चिटणीस पदी प्रदिप कांबळे, उपचिटणिस पदी अनिल लोकरे, सदस्य पदी कैलास निकम यांची निवड झाले बद्दल त्यांचा सत्कार करणेत आला. सदर कार्यक्रमासाठी जिल्ह्य़ातील सर्व आघाडी सदस्य उपस्थित होते. प्रास्तविक भाजपा चित्रपट कामगार आघाडी कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस अभिजीत लिंगनुरकर यांनी केले. चिटणीस अरुण दळवी यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार उपाध्यक्ष मकरंद लिंगनुरकर यांनी मानले.