मुदतीत दोषारोपपत्र दाखल करावे : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर: रेणू पोवार

दि.२७: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांमध्ये पोलिसांनी साठ दिवसांच्या आत तपास करून संबंधितावर मुदतपूर्व दोषारोप पत्र दाखल करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

       जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, पोलीस विभागाकडे जी प्रलंबित प्रकरणी दाखल आहेत या प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करून सर्व प्रकरणे मार्गी लावावीत तसेच यावेळी त्यांनी 15 पिडीतांच्या अर्थसाह्य प्रकरणांना मंजुरी दिली. प्रारंभी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी मागील बैठकीचे इतिवृत्तांत वाचून दाखवले. तसेच पोलीस विभागाकडे तपासाबाबत प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिली .

       या बैठकीसाठी पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, डॉ,रेश्मा पाटील ,एलसीबी पथकाचे एन .डी माळी ,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अभिजीत खोत ,समाजशास्त्र विभागाचे डॉ जगन कराडे ,माहिती अधिकारी फारुख बागवान , अशासकीय सदस्य संतोष तोडकर ,महिला बालविकास विभागाच्या नीलम धनवडे आदी उपस्थित होते.