कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२७: लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ऊसतोड कामगारांच्या आर्थिक प्रश्नांच्या अनुषंगाने असणाऱ्या सुमारे 19 प्रकरणांना आज मंजुरी देण्यात आली .
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी , उर्वरित सात प्रस्तावांच्या त्रुटींची पूर्तता पूर्ण करून ते प्रस्ताव पुन्हा बैठकीत सादर करावेत असे निर्देश देवून ऊसतोड कामगारांच्या अनुषंगाने आता सर्वेक्षण करता येईल का ? याबाबत राज्याकडून मार्गदर्शन मागवावे अशी सूचना ही या बैठकीत केली.प्रारंभी ऊसतोड कामगाराच्या प्रलंबित प्रश्नांबाबत समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आढावा सादर केला. या आढावा बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस,पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की CPR च्या.डॉ रेश्मा पाटील , जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ( जि.प) डॉ. प्रमोद बाबर, महिला बालविकासच्या नीलम धनवडे, माहिती अधिकारी फारुख बागवान ,सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर, गोपीनाथ मुंडे ऊसतोड मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शुभम पाटील,सहाय्यक कामगार आयुक्त भि.धो धर्मेकर, प्रादेशिक साखर कार्यालयाच्या सुप्रिया आरेकर आदी उपस्थित होते .