नागपूर :नंददत डेकाटे
दि: ६ नोव्हेंबर उमरेड मतदारसंघात आज पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी संघटनात्मक चर्चा केली. पक्षाला उमरेड विधानसभेत पक्षाला जनमानसात पोहोचावे, पक्षातील सर्व सामान्य माणसाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे बाळबुधे म्हणाले. यावेळी बाळबुधे यांनी विलास झोडापे यांची उमरेड विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली म्हणून त्यांचे ईश्वर बाळबुधे यांनी विलास झोडापे यांचे विशेष अभिनंदन केले. याप्रसंगी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष डाॅ अनिल ठाकरे, विधानसभा अध्यक्ष विलास झोडापे, प्रकाश वांगे, प्रशांत बारेकर, कैलाश वारेकर, विजय अवचट सह ओबीसी घटकातील प्रमुख कार्यकर्ता उपस्थित होते.