भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

         सांगली: अय्यान पटेल

दि.१४: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सांगली बसस्थानकाजवळील त्यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपमहापौर गजानन मगदूम, समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, स्नेहल सावंत आदिनीही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            यावेळी समाज कल्याण सांगली कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, बार्टी प्रकल्प अधिकारी, समतादूत, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनीचे, तहसीलदार लीना खरात आणि श्री. मोरे आदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.