इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि. १४: मणेरे शैक्षणिक संकुलात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट परिवारात आज दि. १४ एप्रिल २०२६ रोजी जयंती कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शितलकुमार सुधाकरराव मणेरे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.कार्यक्रमात संस्थेचे मार्गदर्शक मा. श्री. अशोक वसगडे यांनी डॉ. आंबेडकर यांचे उदात्त विचार मांडले. कॉलेज विभागाच्या सहाय्यक शिक्षिका सौ. प्रतिभा बावचे यांनी आपल्या भाषणातून आंबेडकरांचे भारतीय समाजासाठीचे योगदान विशद केले. विद्यार्थिनी अस्मिता साळे व गौरी शिंदे यांनीही डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभावी भाषणे केली.यावेळी मणेरे परिवारातील सौ. साक्षी मणेरे यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमास संस्थेचे सेक्रेटरी श्री. अनिलकुमार मणेरे, उपाध्यक्ष श्री. सुभाष केटकाळे, ज्योती मणेरे, साक्षी मणेरे, मार्गदर्शक अशोक वसगडे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ. ऐनापुरे पी. बी., हायस्कूल व कॉलेजच्या प्राचार्या सौ. मंगसूळे वी. वी., उपमुख्याध्यापिका सौ. व्हनबटटे मॅडम, सर्व विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. दिपाली चौगुले यांनी केले.