मणेरे शैक्षणिक संकुलातील माजी विद्यार्थी सुरज देबाजे यांचा सत्कार

इचलकरंजी: विजय मकोटे

दि.१४: मणेरे शैक्षणिक संकुलातील माजी विद्यार्थी व नवनिर्वाचित राज्य आयकर आयुक्त सुरज बापुसो देबाजे यांचा संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला.
श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट परिवारात आयोजित कार्यक्रमात श्री. देबाजे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात २८ वा क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री. अनिलकुमार सुधाकरराव मणेरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.मनोगतात श्री. सुरज देबाजे यांनी या यशामागे मणेरे शैक्षणिक संकुलाचा सिंहाचा वाटा असल्याचे नमूद केले. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शितलकुमार मणेरे यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हायस्कूल व कॉलेजच्या प्राचार्या सौ. मंगसूळे मॅडम यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी सांगत शैक्षणिक प्रवास उलगडून दाखवला. तसेच दहावी बोर्ड परीक्षेत प्रथम येऊन त्यांनी शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला असल्याचे त्यांनी नमूद केले.
मार्गदर्शक मा. श्री. अशोक वसगडे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास उपाध्यक्ष श्री. सुभाष केटकाळे, ज्योती मणेरे, साक्षी मणेरे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ. ऐनापुरे पी. बी., उपमुख्याध्यापिका सौ. व्हनबटटे मॅडम, सर्व विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. दिपाली चौगुले यांनी केले.