श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त आयोजित

श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहची सांगता
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.१५: नदी वेस येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्तआयोजित  “श्री गुरुचरित्र पारायण, ,अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताहची सांगता बुधवार  झाली. सप्ताह काळात श्री गणेशयाग व मनोबोध याग, चंडीयाग , श्री स्वामी याग, श्री गिताई याग, श्री रुद्र याग,मल्हारी याग संपन्न झाले.बुधवारी बली पुर्णाहुती,सत्यदत्त पुजन होऊन सकाळी १०-३०वा.महाआरती करण्यात आली. 
       सप्ताह काळात श्री गुरुचरित्र सामूहिक वाचन, अन्य आध्यत्मिक सेवा, अखंड२४ तास महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी प्रहरेची सेवा रुजू केली. श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाल आरती तसेच मानवीय जीवनातील कोणत्याही समस्येवर ईश्वरी सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन सेवा केंद्रात सुरू असून याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.