इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१५: येथील डीकेटीईच्या एआय अॅण्ड एमएल (२०२५ बॅच) शाखेची विद्यार्थीनी सेजल पांढरपटटे हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखन्नीय यश संपादन करत जपानमधील आघाडीच्या दूरसंचार राकुटेन या मल्टिनॅशनल मोबाईल कंपनी मध्ये सॉफटवेअर डेव्हलपर या पदासाठी निवड झाली आहे. तीला या कंपनीने वार्षिक २५ लाखांचे पॅकेज दिले आहे. राकुटेन मोबाईल कंपनी ही जपानमधील प्रमुख मोबाईल नेटवर्क ऑपरेटपैकी एक असून फोरजी व फायजी सेवा देशभर पुरवते तसेच ई कॉमर्स, फिनटेक आणि डिजीटल सेवांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर ३० हून अधिक देशांमध्ये कार्यरत असलेली ही बहुराष्ट्रीय कंपनी आहे. अशा प्रतिष्ठित कंपनीमध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची निवड होणे ही संस्थेच्या गुणवत्तेची जागतिक पातळीवरील ठोस नोंद ठरली आहे.
डीकेटीईमधील अत्याधुनिक प्रयोगशाळा, उदयोगाभिमूख अभ्यासक्रम, तज्ञ प्राध्यपकांचे मार्गदर्शन आणि कौशल्यविकासावर दिलेला भर यामुळे येथील विद्यार्थी सातत्याने जागतिक स्तरावर यशाची नोंद करत आहेत. यापूर्वीही डीकेटीईमधील विद्यार्थ्यांनी ४५ लाख, ४२ लाख, २५ लाख, २२ लाख व १८ लाख इतक्या पॅकेजवर नामांकित कंपन्यामध्ये यशस्वी निवड झालेली आहे त्यामुळे अनेक उच्चस्तरीय कंपन्याचे लक्ष आता डीकेटीईकडे वळले आहे.
सेजलची ही यशस्वी झेप ही डीकेटीईच्या शैक्षणिक उत्कृष्टतेची व आंतरराष्ट्रीय विश्वासार्हतेची ठोस पावती आहे. विद्यार्थ्यांना सर्वोच्च पॅकेज देणा-या देशातील अघाडीच्या अग्रगण्य संस्थामध्ये डीकेटीईचा समावेश होत आहे ही बाब इचलकरंजीसाठी तसचे सर्व डीकेटीईन्ससाठी अत्यंत अभिमानाची आहे अशी प्रतिक्रीया संचालिका डॉ एल.एस.आडमुठे यांनी व्यक्त केली.
सेजलच्या या यशाबददल डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या तर संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख डॉ एस.के.शिरगावे, टीपीओ प्रा. जी.एस.जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सेजल पांढरपटटे ची चौकट
डीकेटीईमध्ये प्रवेश घेतल्यानंतर केवळ शैक्षणिक ज्ञानच नाही,तर प्रत्यक्ष उद्योगाभिमुख कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली. प्रकल्पाधारित शिक्षण, आधुनिक प्रयोगशाळा आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन यामुळे आत्मविश्वास व तांत्रिक क्षमता मोठया प्रमाणात विकसीत झाली. आज आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करण्याची संधी मिळणे हे डीकेटीईने दिलेल्या भक्कम पायाभरणीमूळेच शक्य झाले आहे. इथले शिक्षण, तंत्रज्ञान आणि प्रॅक्टीकल एक्स्पोजर यामुळेच मी जागतिक स्तरावर स्वतःला सिदध करु शकले.