इचलकरंजी. संजय आंबे
दि 13 नोव्हेंबर इचलकरंजी नाट्य परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक श्रीकांत सखाराम फाटक यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. महाविद्यालयीन दशेतपासून फाटक हे नाट्यक्षेत्रात कार्यरत होते. निष्पाप क्रिएशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक नाटके रंगमंचावर सादर केली. अनेक नाटकांचे लेखन करुन त्याचे दिग्दर्शनही केले. त्यांच्या अनेक नाटकांना राज्य पातळीवरील पारितोषिके मिळाली होती. देशात विविध ठिकाणी होणार्या नाट्य स्पर्धेचे परिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. कल्चरल एज्युकेशन सोसायटी व ललित कला महाविद्यालयाचे ते अध्यक्ष होते. चौंडेश्वरी सहकारी सूत गिरणीचे ते माजी अध्यक्ष व बँकेचे माजी संचालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुले, नातवंडे असा परिवार आहे.