इचलकरंजी: विजय मकोटे
दि.२९ : भारत सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एनएमएमएस परीक्षेमध्ये रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी यंदाही आपले वर्चस्व कायम राखले असून, या परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या इयत्ता आठवीमधील यश यल्लप्पा पुजारी, अन्विका हेमंत जाधव, रोहिणी अरविंद देवरेड्डी, राजवर्धन सिद्राम पोवार, हर्षवर्धन सिद्राम पोवार आणि नव्या भरत पाटील या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगरपालिका शिक्षण समितीच्या सभापती सौ. विद्या साळुंखे होत्या; यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि “विद्यानिकेतन पॅटर्न” यशस्वी ठरत असल्याचे नमूद केले. याप्रसंगी शिक्षण समितीच्या उपसभापती सौ. पूनम माळी, नगरसेविका सौ सुरेखा जाधव, सौ. स्नेहल रावळ आणि मुख्याध्यापिका डॉ. अलका शेलार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक राजेंद्र घोडके यांनी केले, सूत्रसंचालन अजित शेट्टी यांनी केले, तर शुभदा पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला पालक,सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.